Saturday, April 11, 2009

आजचे भविष्य


आजचे भविष्य
मेष : आर्थिक प्राप्ती अपेक्षे-प्रमाणे होईल. खर्चही तसाच होईल. फळफळावळांच्या व्यापारात फायदा होईल. इतरांचे सहकार्य घ्या. महिला : वैवाहिक सौख्य लाभेल. इतरांच्यावर अवलंबून असलेली कामे हाती घ्या. युवक : विरंगुळा म्हणून छोटी ट्रिप काढा. लॉंग ड्राईव्हला जा किंवा बाहेर फेरफटका मारा.
वृषभ : नोकरीत काम वाढेल व ते एकट्याने करावे लागेल. धंदा व्यवसायात नुकसान होण्याची भीती राहील. महिला : गृहिणींचे काम वाढेल. इतरांनी केलेली टीका ऐकून घ्यावी लागेल. युवक : विचारांची दिशा चुकण्याची शक्‍यता आहे. पण आज घेतलेले कष्ट वाया जाणार नाहीत.
मिथुन : संततीच्या सहवासाचा आनंद घ्याल. नशिबाची थोडी साथ राहील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. महिला : धार्मिक कामात लक्ष घालाल. संततीकडे लक्ष राहील. शारीरिक तक्रारीकडेही लक्ष असू द्या. युवक : रोमॅंटिक मूडमुळे आपल्या कर्तव्यात कसूर होऊ देऊ नका. शिक्षणासाठी पैशाची तरतूद करा.
कर्क : कामात शिथीलता येईल. जोखमीच्या ठिकाणी काळजीपूर्वक काम करा. महिला : हाऊसकिपिंगकडे लक्ष राहील. शारीरिक थकवा जाणवेल. घरातील यंत्रांची दुरुस्ती निघेल. युवक : घराला तुमचा आधार वाटेल. वाहनांच्या मेन्टेनन्सकडे लक्ष द्या
सिंह : नोकरीत वरिष्ठ विश्‍वासाने तुमच्यावर अधिक जबाबदारीची कामे सोपवतील. गाठीभेटी घ्या. छोटा प्रवास घडेल. महिला : भावंडांची जबाबदारी घ्यावी लागेल. वैवाहिक जीवनात ताणतणाव जाणवतील. तरीही उत्साही कार्यरत रहाल. युवक : मनोबल चांगले राहील. "रिझल्ट ओरिएंटेड' रहाल.

विजयी धोनी ब्रिगेडचे ग्रॅंड वेलकम


न्यूझीलंडच्याच भूमीत किवींना चारीमुंड्या चीत करुन इतिहास रचणारी धोनी ब्रिगेड गुरुवारी सकाळी मायदेशी परतली. धोनीचे धुरंधर भारतात पोहचताच वेगवेगळ्या मार्गाने स्वगृहाकडे रवाना झाले. परंतु प्रत्येक ठिकाणी टीम इंडियाच्या या स्टार्स खेळाडूंचे "ग्रॅंड वेलकम' करण्यात आले.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसमवेत पाच भारतीय खेळाडूंचे गुरुवारी सकाळी मुंबई विमानतळावर आगमन झाले. एकदिवसीय व कसोटी सामन्यात भारताच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरलेले तेंडुलकर, झहीर खान, हरभजन सिंग, धवल कुलकर्णी, मुनाफ पटेल येथून आपल्या स्वगृही परतले. अत्यंत लांबच्या व कंटाळवाण्या प्रवासामुळे खेळाडू थकल्यासारखे दिसत होते. परंतु न्यूझीलंडमध्ये घडवलेल्या पराक्रमाची चमक त्यांच्या डोळ्यात स्पष्ट जाणवत होती."कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनी आणि देशाच्या उत्तर भागामध्ये राहणारे खेळाडू दुसऱ्या एका विमानाने थेट दिल्लीला रवाना झाले. तसेच राहुल द्रविड, व्ही. व्ही.एस. लक्ष्मण आणि दिनेश कार्तिकसारख्या दक्षिण भारतात राहणाऱ्या काही खेळाडूंनी येथून आपल्या शहरासाठी फ्लाईट पकडली. कर्णधार धोनी समवेत न्यूझीलंड दौऱ्यावरील ऐतिहासिक विजयाचा नायक ठरलेला दिल्लीकर सलामी फलंदाज गौतम गंभीर, धडाकेबाज सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग, टीम इंडियाचा स्पिडस्टर ईशांत शर्मा, ऑफ स्पिनर अमित मिश्रा हे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले, तेव्हा त्यांची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट-प्रेमींनी एकच गर्दी केली होती. या ऐतिहासिक दौऱ्यानंतर खेळाडूंची पहिली प्रतिक्रिया मिळवण्यासाठी पत्रकारांचीही झुंबड उडाली. परंतु त्यांच्या हाती निराशाच लागली. हे सर्व खेळाडू पत्रकारांशी संवाद न साधताच आपल्या सुरक्षारक्षकांच्या साथीने निघून गेले.यावेळी वीरेंद्र सेहवागसमवेत त्याची पत्नी आरती होती तर ईशांतचे वडील विजय शर्मा हे परदेशात भारताचा झेंडा उंचावणाऱ्या आपल्या लाडक्‍या मुलाला घ्यायला विमानतळावर आले होते.मंगळवारी वेलिंग्टन येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने भारतीय संघाला विजयाची हुलकावणी दिल्यानंतर भारताने ही मालिका 1-0 ने आपल्या नावे करुन इतिहास घडवला. तत्पूर्वी भारताने हॅमिल्टन कसोटीत 10 विकेटनी शानदार विजय साकारला तर नेपियर कसोटी अनिर्णीत राहिली. गेल्या 41 वर्षात न्यूझीलंडच्या भूमीत भारताचा हा पहिला कसोटी विजय ठरला.यापूर्वी 1967-68 मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांच्या संघाने हा कारनामा करुन दाखवला होता. तत्पूर्वी भारताने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने बाजी मारली आणि न्यूझीलंडच्या भूमीतील भारताचा पहिला एकदिवसीय मालिका विजय आहे.

आम्ही ठरवू पंतप्रधान


लोकसभेच्या निवडणुकीनंतर चौथी आघाडी म्हणजेच आम्ही तिघे भाऊ ठरवू तोच नेता पंतप्रधान होईल, असा आत्मविश्‍वाससमाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि लोकजनशक्‍ती पक्षाचे अध्यक्ष राम विलास पासवान यांनी गुरुवारी संयुक्‍त जाहीर सभेत व्यक्‍त केला. या तिन्ही नेत्यांनी येथील प्रचारसभेत कॉंग्रेस आणि बहुजन समाज पक्षावर कडाडून टीका केली. भारतीय जनता पक्षावरही जोरदार हल्ले चढवले. लालूप्रसाद म्हणाले, उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार या राज्यात धर्मांध शक्‍तींना धूळ चारण्यासाठी आम्ही तिघे एकत्र आलो आहोत. आम्ही संघटितपणे गरीब आणि दुर्बलांची लढाई लढत आहोत. आपणच दलितांच्या तारणहार असल्याची ढोंगबाजी करणाऱ्या मायावती याच दलितांच्या सर्वात मोठ्या शत्रू असल्याचा हल्ला पासवान यांनी चढवला. बसपचा हत्ती भांडवलदारांच्या दावणीला बांधला गेल्याची टीकाही त्यांनी केली. या निवडणुकीत उत्तर प्रदेशात बसप आणि कॉंग्रेस, भाजप या तिन्ही पक्षांचा मतदार दणकून पराभव घडवतील, असे भाकीत मुलायम सिंग यादव यांनी केले.

बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार कोण




मुंबई, राष्ट-वादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते विलासराव देशमुख हे रासर्वांत लोकप्रिय नेतेज्यातील असल्याचे एन.डी. टी.व्ही. या वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. या सर्वेक्षणात राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 30 जागा कॉंग्रेस-राष्ट-वादी आघाडीला तर 18 जागा शिवसेना-भाजपा युतीला मिळतील, असा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे.लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एन. डी. टी. व्ही. या वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात 28 टक्‍के मतदारांनी शरद पवार यांना सर्वोत्तम नेता म्हणून कौल दिला आहे. तर 25 टक्‍के मतदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पसंती दिली आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख लोकप्रियतेत त्यांच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर असून 15 टक्‍के मतदारांनी त्यांना सर्वोत्कृष्ट म्हणून पसंती दिली आहे. राज ठाकरे चौथ्या क्रमांकावर असून 12 टक्‍के मतदारांनी त्यांना कौल दिला आहे.राज्यात कॉंग्रेस-राष्ट-वादी-रिपाइं आघाडीला मागच्या निवडणुकीपेक्षा चांगले यश मिळेल, असा अंदाज सर्वेक्षणात व्यक्‍त करण्यात आला आहे. 48 पैकी 30 जागा आघाडीला तर 18 जागा शिवसेना-भाजपा युतीला मिळतील असा अंदाज आहे. तिसरी आघाडी, बसपा, मनसेने यावेळी अनेक उमेदवार उभे करून जोर लावला असला तरी त्यांना यश मिळणार नसल्याचे सर्वेक्षणात पुढे आले आहे. राज ठाकरेच खरे वारसदार!या सर्वेक्षणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार कोण असावेत, या प्रश्नावर 50 टक्‍के लोकांनी राज ठाकरे यांच्या बाजूने कौल दिला आहे. तर उद्धव ठाकरे यांना 32 टक्‍के मतदारांची पसंती मिळाली आहे. 35 टक्‍के मतदारांनी राज ठाकरे यांचे परप्रांतियांविरूद्धचे आंदोलन योग्य असल्याचा कौल दिला आहे तर 57 टक्‍के मतदारांनी अयोग्य असल्याचे मत व्यक्‍त केले आहे.