Saturday, April 11, 2009

सुनील गायकवाड (भाजप) आणि अॅड. बाबासाहेब गायकवाड (बसप) लढणार आहेत.


लातूर राखीव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी पत्रकार परिषदेत सांगतले की, जयवंत आवळे (काँग्रेस), सुनील गायकवाड (भाजप) आणि अॅड. बाबासाहेब गायकवाड (बसप) लढणार आहेत. नोंदणीकृत राजकीय पक्षांचे १३ उमेदवार असून त्यात माजी आमदार टी. एम. कांबळे (रिपब्लिकन पाटीर् ऑफ इंडिया डेमॉक्रेटिक) जनसुराज्य शक्तीचे तुकाराम गन्ने यांचा समावेश आहे. ५ उमेदवार अपक्ष आहेत. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये जास्तीत जास्त १६ नावे समाविष्ट होऊ शकतात. परंतु, लातुरात १८ उमेदवार झाल्यामुळे दोन मशीनचा वापर करावा लागणार आहे. लातूर मतदारसंघात आतापर्यंत आचारसंहिताभंगाचे ८ गुन्हे दाखल झाले असून त्यांच्याविरुध्द कारवाईही झाली आहे. लातूर जिल्ह्यात ६१८ शस्त्र परवानाधारक असून त्यातील ४६० शस्त्रे जमा झाली आहेत. अनेकांनी शस्त्र बाळगण्याविषयी अर्ज दाखल केले असून त्याची छाननी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख संजय लाठकर यांनी दिली.
-----------------------

हे जयवंत आवळे कोण? कोणाचे?

हो नाही करत काँग्रेस पक्षाने बुधवारी माजी समाजकल्याण मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जयवंत आवळे यांची उमेदवारी लातूर मतदारसंघासाठी घोषित केल्याची बातमी लातूरमध्ये येऊन पोचताच मतदार नागरिकांत हे जयवंत आवळे कोण? याची चर्चा सुरू झाली. काँग्रेस कार्यकतेर् आणि राजकीय कार्यर्कत्यांत मात्र आवळे विलासरावांचे?, दिलीपरावांचे? की शिवराज पाटील यांच्यापैकी कोणाचे असावेत यासंबंधी आडाखे बांधणे सुरू झाले आहे. लातूर मतदारसंघासाठी वर्षानुवषेर् काँग्रेस पक्षाची निष्ठेने सेवा करणाऱ्या स्थानिक २९ दलित कार्यर्कत्यांनी उमेदवारी मागितली होती. पक्षाने विविध इच्छुकांचा मुलाखती घेण्याचा फार्सही यशस्वी केला होता. त्यानंतर अभ्यासू तरुण वकील असलेल्या लातूर नगराध्यक्षांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून विविध वाहिन्यांनी दाखविण्यास सुरुवात करताच ९ उमेदवार एकत्र आले आणि त्यांनी मुळ दलिताला उमेदवारी देण्यात यावी, असा निर्वाणीचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने लातूरशी काडीचाही संबध नसलेल्या जयवंत आवळे यांना उमेदवारी देऊन लातूरची जनता म्हणजे काँग्रेसची बांधील आहे, असा समज करून घेतला आहे का? असा सवाल विचारला जात आहे. क्रीडामंत्री दिलीप देशमुख यांनी मात्र उमेदवार घोषित होण्यापूवीर्च भाजपाने रामाला फसवले आहे, आता रामही काँग्रेसलाच मते देईल, अशी तिखट टीका करीत प्रत्येक तालुक्यात काँग्रेस कार्यर्कत्यांचे मेळावे घेऊन यंत्रणा सज्ज केली आहे. आता प्रश्न एवढाच आहे की, या वेळी उमेदवार कोण हे न पाहता मी जामीनदार आहे असे विलासराव म्हणणार की, दिलीपराव की, शिवराज पाटील या वाक्याची वाट पहावी लागणार आहे, असे लोकच उघडपणाने बोलू लागले आहेत. जयवंतराव आवळे यांचे ३ एप्रिल रोजी आगमन होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. त्रिंबकदास झंवर यांनी दिली.

No comments:

Post a Comment