Saturday, April 11, 2009

आम्ही ठरवू पंतप्रधान


लोकसभेच्या निवडणुकीनंतर चौथी आघाडी म्हणजेच आम्ही तिघे भाऊ ठरवू तोच नेता पंतप्रधान होईल, असा आत्मविश्‍वाससमाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि लोकजनशक्‍ती पक्षाचे अध्यक्ष राम विलास पासवान यांनी गुरुवारी संयुक्‍त जाहीर सभेत व्यक्‍त केला. या तिन्ही नेत्यांनी येथील प्रचारसभेत कॉंग्रेस आणि बहुजन समाज पक्षावर कडाडून टीका केली. भारतीय जनता पक्षावरही जोरदार हल्ले चढवले. लालूप्रसाद म्हणाले, उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार या राज्यात धर्मांध शक्‍तींना धूळ चारण्यासाठी आम्ही तिघे एकत्र आलो आहोत. आम्ही संघटितपणे गरीब आणि दुर्बलांची लढाई लढत आहोत. आपणच दलितांच्या तारणहार असल्याची ढोंगबाजी करणाऱ्या मायावती याच दलितांच्या सर्वात मोठ्या शत्रू असल्याचा हल्ला पासवान यांनी चढवला. बसपचा हत्ती भांडवलदारांच्या दावणीला बांधला गेल्याची टीकाही त्यांनी केली. या निवडणुकीत उत्तर प्रदेशात बसप आणि कॉंग्रेस, भाजप या तिन्ही पक्षांचा मतदार दणकून पराभव घडवतील, असे भाकीत मुलायम सिंग यादव यांनी केले.

No comments:

Post a Comment